चिपळूण ; पालवण येथील शासकीय विहीर गेली चोरीला..?

0
819
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील पालवण सावर्डेकरवाडी येथील शासकीय विहीर चोरीला गेली आहे, अशा आशयाचे निवेदन अशोक गणपत सावर्डेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील व उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे केली.

पालवण येथील सावर्डेकरवाडी या ठिकाणी दिनांक २ मे १९६८ साली ८ बाय १० जांभ्याची विहीर बांधण्यासाठी २,८६६ रुपयांचा निधी मंजूर झाला होता. ती विहीर १९७२ साली बांधण्यात आली आहे, अशी नोंद उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग चिपळूण रजिस्टर नंबरब ३९ स्थावर मालमत्ता नोंद अनुक्रमांक ११६ नमूद केले आहे. सदरची माहिती उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिपळूण यांच्या कार्यालयातील नोंदीनुसार आहे.

कागदावर खोदलेली विहीर तहाण कशी भागवणार? असे सावर्डेकर म्हणाले. याबाबत तातडीने पालवण सावर्डेकरवाडीमध्ये आपल्या कार्यालयातील नोंदीनुसार बांधण्यात आलेली पाणी पिण्याची विहीर चोरीस गेली आहे. तरी आपण आपल्या स्तरावर चौकशी करून चोरीस गेलेली विहीर शोधून काढावी व विहीर चोरावर फौजदारी दाखल करावी, तसेच शासकीय मालमत्तेचे जतन करावे, अशी मागणी अशोक सावर्डेकर यांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here