एस.टी च्या २१३ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

0
180
बातम्या शेअर करा

चिपळूण – राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यातील २१३ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या फुकट्यांकडून ९३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्य शासनाने सर्व महिला प्रवाशांना तिकिटदरात निम्मी सवलत जाहीर केली आहे. १७ मार्चपासून महिला सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेतंर्गत सर्व वयोगटातील महिलांना निम्म्या तिकिटात प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे एसटीच्या भारमानात वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी वाहकाची नजर चुकवून तिकीट न काढता फुकटात प्रवास करतात.
सध्या एसटी प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम तीव्र करत सर्व मार्गावर सुरू केली आहे. महिला प्रवासी आवर्जून तिकीट मागून घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून अन्य २१३ फुकट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here