बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर मधील देवघर येथे सात मुलांनी चायनीज अन्नपदार्थ खाल्याने त्यांना विषबाधा झाली आहे.

गुहागर चिपळूण मार्गावरील एका चायनीज सेंटर येथे काल रात्रीच्या वेळी चायनीज खाल्ल्यानंतर या सात जणांची प्रकृती बिघडली त्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली.
त्या सात जणांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने गुहागर मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सध्या सात जणांची प्रकृती स्थिर आहे. गुहागर पोलीस याबाबत तपास करत आहेत. चायनीज खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याचे प्रकरण पुढे आल्याने तालुक्यातील सर्वच चायनीज सेंटरचे आणि हॉटेलची पाहणी करावी अशी मागणी आता या निमित्ताने पुढे येऊ लागली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here