चिपळूण – चिपळूण शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात आज पासून जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष, काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शहा यांनी केले.
कोकणात अनेक स्पर्धा होतात. मात्र इनडोअर स्पर्धा या कमी प्रमाणात होत असल्याने या स्पर्धेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा स्पर्धा प्रामुख्याने घेण्यात याव्यात, त्यासाठी लागणारे सहकार्य सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी करायला हवे असे मत लियाकत शाह यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2023/04/IMG-20230429-WA0026.jpg)
आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक नामवंत स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना पहिल्या फेरीपासून पाच रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. जीएसके न्यूज, प्रगती टाइम्स, ब्रेकिंग महाराष्ट्र पुरस्कृत, साई कॅरम हाऊस चिपळूण आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, कुमार गट, कुमारी गट अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2023/04/IMG-20230429-WA0032.jpg)
या स्पर्धेवेळी संभाजी ब्रिगेडचे कोकण कार्याध्यक्ष मकरंद जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र मोरे, जीएसके न्यूजचे संपादक गजेंद्र खडपे, प्रगती टाइम्सचे संपादक लक्ष्मीकांत उर्फ पिंट्या घोणसेपाटील, ब्रेकिंग महाराष्ट्रचे संपादक संतोष पिलके, माजी नगरसेवक संजय रेडीज, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते, संतोष जोगळेकर, राष्ट्रीय पंच साईप्रसाद कानिटकर, विवेक देसाई, साई कॅरम हाऊसचे मालक संतोष शिगावण, स्पर्धाप्रमुख दीपक वाटेकर, महेश टाकळे, सागर सावंत, उदय गुरव, स्वप्निल चव्हाण आदी उपस्थित होते.