बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. या स्पर्धेत पुरुष एकेरी मध्ये अभिषेक चव्हाण हा अजिंक्य ठरला तर राहुल भस्मे हा उपविजेता ठरला.

जीएसके न्यूज, प्रगती टाइम्स, ब्रेकिंग महाराष्ट्र पुरस्कृत, साई कॅरम हाऊस चिपळूण आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अनेक नामवंत स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
पुरुष एकेरी विजेता- अभिषेक चव्हाण -उपविजेता :- राहूल भस्मे
पुरुष एकेरी उपान्त्य विजेता (तृतीय) विजय कोंडविलकर पुरुष एकेरी उपान्य विजेता (चतुर्थ) मुक्तानंद वरखडेकर.
पुरुष दुहेरी विजेता – अभिषेक चव्हाण-वरुण वरक
पुरुष दुहेरी उपविजेता – राहूल भस्मे-विजय कोंडविलकर
पुरुष दुहेरी उपान्त्य विजेता दिपक वाटेकर ,अभिनित खेडेकर
पुरुष दुहेरी उपान्त्य विजेता (तृतीय) दिपक वाटेकर अभिजित खेडेकर
तर पुरुष दुहेरी उपान्य विजेता (चतुर्थ)- दिनेश पारकर- ओम पारकर
कुमार गट विजेता- ओम पाटकर
कुमार गट उपविजेता – द्रोण जा
कुमारी गट विजेता – आकांशा कदम ‘कुमारी गट उपविजेती – निधि सप्रे

स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी जीएसके न्यूजचे संपादक गजेंद्र खडपे, प्रगती टाइम्सचे संपादक लक्ष्मीकांत उर्फ पिंट्या घोणसेपाटील, ब्रेकिंग महाराष्ट्रचे संपादक संतोष पिलके, कॅरम असोशियन पदाधिकारी रवि घोसाळकर, युवासेना प्रमुख निहार कोवळे, चिपळूण नगरपरिषदचे अधिकारी राजेंद्र खातु, माजी नगरसेवक संजय रेडिज, कॅरम असोशिअन सेक्रेटरी मिलिंद साप्ते, विवेक देसाई यांची उपस्थित लाभली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धाप्रमुख दिपक वाटेकर, राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर, कैलास देवळेकर, संतोष शिगवण,अभिजित खेडेकर, घनश खेडकर, प्राजक्त खवणेकर ,सागर सकपाळ, महेश ताडे, सुधीर दाते ज्येष्ठ कॅरम खेळाडू, संतोष जोगळेकर, अक्रम पेंडसे, पराग,राजू जोगळेकर, संतोष वाडेकर, सदानंद सुर्वे , महेश टाकळे, सागर सावंत, उदय गुरव , स्वप्निल चव्हाण आदींनी मेहनत घेतली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here