रत्नागिरी -शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ उद्धव ठाकरे घेत आहे. आज 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा होणार आहे.सभेच्या पूर्वतयारीचा टीजर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे.
‘सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे, विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे’ असं उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होत. त्यामुळे आज होणाऱ्या या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या अधिकृत ट्विटर हॅण्डलरवरून एक टीजर प्रसारित करण्यात आला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे भाषणातील काही काही डायलॉग ऐकायला मिळतोय. ‘आता जिंकेपर्यंत लढायचं’ अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
‘निष्ठा मातोश्रीशी,इमान भगव्याशी’ या आशयाखाली शिवसैनिकांना या सभेसाठी साद घालण्यात आली आहे. मला माझे सैनिक अन्यायावर वार करणारे पाहिजे पाठीत वार करणारे नको असंही ठाकरे यामध्ये बोलताना ऐकायला मिळतंय. तसेच तुम्ही मला वज्रमूठ द्या.. दात पाडायचं काम मी करतो असं आवाहन देखील या टीजरद्वारे शिवसैनिकांना करण्यात आलं आहे.