खेड – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज खेडमध्ये सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून उद्धव ठाकरे रविवारी सकाळी खेडमध्ये दाखल झाले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे निष्ठावंत आमदार भास्कर जाधव यांनी मिंधे गटावर टीकास्त्र सोडले.
होळीच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की, होळी म्हणजे ज्या वाईट गोष्टी असतात, जे चुकीचे घडलेले असते, जी गद्दारी झालेली असती, अनेकांच्या मनात द्वेष-द्वेषभावना असते या सगळ्यांना त्या होळीमध्ये आपण अग्नी द्यायचा असतो आणि पवित्र, मांगल्य, चांगल्या विचारांच्या कामाला सुरुवात करायची असते. महाराष्ट्रात जी गद्दारी झालीय, लोकशाही, संविधान याला संपवण्याचे काम जे करत आहेत त्यांच्या विचारांना उद्धव ठाकरे होळीमध्ये तिलांजली देतील, असे भास्कर जाधव म्हणाले.















