गुहागर (मंगेश तावडे )- रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात प्रथम कोरोना रुग्ण हा शुंगारतळी सापडला होता. त्यानंतर काही नागरिकांना कोरोना होऊन नंतर गुहागर तालुका हा संपूर्ण कोरना मुक्त झाला होता. आता याच गुहागर तालुक्यातील चिखली येथे तब्बल 35 कोरना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चिखली आता हॉटस्पॉट बनले असून चिखली कदमवाडी आयसोलेट करण्यात आली आहे.
गुहागर – चिपळूण या मुख्य मार्गावरील चिखली हे गाव या गावात गेल्या दोन दिवसापूर्वी एकूण 35 कोरोना पॉझिटिव रुग्ण सापडले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून चिखली कदमवाडी आयसोलेट करण्यात आली आहे. मात्र असे असे असले तरी चिखली या गावात अद्याप कोणतीही आरोग्य यंत्रणा फिरकली नसल्याची खंत येथील नागरिकांनी बोलून दाखवली जर आमच्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असतील तर आरोग्य यंत्रणा व प्रशासन आमची कोणतीही तपासणी का करत नाही? किंवा आरोग्य कर्मचारी सर्व्हे का करत नाही ? याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. चिखली या गावात लोकसंख्या खूप आहे त्यामुळे त्वरित येथे आरोग्य यंत्रणेला सर्व्हे करायला सांगून लोकांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
गुहागर तालुक्यात पॉझिटिव रुग्णांची एकूण संख्या 75 झाली आहे यातील 22 रुग्ण बरे झाले आहेत तर 2 जणांचा मूर्त्यु झाला आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/07/IMG-20200719-WA0007-1024x1024.jpg)