दापोली -नुकत्याच दापोलीत आलेल्या तालुक्यातील नव्या प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हजर होऊन चार दिवस झाले नाहीत तोच कर्मचाऱ्यांच्या मिटींग घेऊन व केंद्राना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे समस्या सोडवण्याऐवजी मनस्ताप देण्याचे तंत्र अवलंबल्याने आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांना काम करूनही नवीनच समस्या सहन करावा लागत असल्याची चर्चा आरोग्य विभागात रंगू लागली आहे. यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे असून याचा थेट परिणाम आरोग्य सेवेवर होण्याची भीती आहे.
दापोलीतील तालुका आरोग्य अधिकारी रजेवर गेल्यामुळे मंडणगड येथील एका अधिकाऱ्याकडे दापोलीचे कामकाज पाहण्यासाठी अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. कार्यभार आल्यापासून हा अधिकारी कर्मचाऱ्यांकडे दंबगगिरी करत असल्याची चर्चा आहे.नुकतीच तालुका कार्यालयात मिटिंग घेऊन या अधिकाऱ्यांच्या नाहक बडबडीमुळे महिला कर्मचाऱ्याचा बीपी हाय होऊन त्रास झाल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर माझा मोबाईल नंबरही कोणाला देऊ नका अशी तंबीच त्यांनी काही कर्मचाऱ्यांना दिल्याचीही चर्चा आहे.
कोव्हिडं 19 च्या काळात आरोग्य कर्मचारी गेले तीन-चार महिने जीवाची बाजी लावून काम करत असून एखाद्या योद्ध्याला लाजवेल असे कार्य कर्मचारी करीत असताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवा बिराजदार यांनी योग्य पध्दतीने चालवलेले तालुका प्रशासन आता मात्र या नव्या अधिकाऱ्यामुळे हैराण झाले आहे. हा नवा प्रभारी अधिकारी अधिकारी रुबाबाबत असून तालुक्याच्या आरोग्याचा तारणहार आपणच या तोऱ्यात वावरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून दापोली तालुका आरोग्य अधिकारी म्हणून तालुक्यातीलच डॉक्टरची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नुकतेच तालुक्यातील तीन कर्मचारी कोरोना बाधित झाले असून आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री. शिगवण यांनीही योद्ध्याला लाजवेल असे कार्य केले मात्र त्यांचा काम करताना आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य सेवक संदिप पांगत यांचाही मृत्यू झाला आहे. या नुकतेच मयत झालेल्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाकडून तातडीने मदत व अनुकंपा मिळवून देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. त्या ऐवजी सदरचा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आरोग्य विभागात कामकाज सुरळीत सुरू असताना प्रशासकीयदृष्ट्या विचार करता आरोग्य विभाग सुरळीत चालण्यासाठी दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम, तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी तातडीने लक्ष घालून या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्याची मागणी दापोलीकरांकडून करण्यात येत आहे.
दापोली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा चांगले आहे त्या परिस्थितीत काम करत आहे. मात्र असे असतानाही अतिरिक्त कार्यभार असलेले मंडणगड येथील डॉक्टर दापोली तालुक्यात कर्मचाऱ्यांना मनस्ताप होईल असे वागत आहेत. याची माहिती आपल्याकडेही आली असून हा सगळा प्रकार कोरोना आपत्ती सुरू असताना घडत असेल तर दुर्देवी आहे. या सगळ्या प्रकारची चौकशी करून त्यांचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ काढून घ्यावा अशी मागणी आपण आमदार योगेश कदम यांच्याकडे भेट घेऊन करणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य व सेनेचे युवा नेते निलेश शेठ यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली.