संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील धामापूर भायजेवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. यश महाडिक वय -22 वर्षे आणि विजय भालेकर वय -21वर्षे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ पासून या परिसरात मुसळधार पडत आहे. त्या पावसामुळे हा बंधारा भरून वाहत आहे. धामापूर पीर येथील पाच जण आज दुपारी पोहायला गेले होते. यापैकी यश महाडिक आणि विजय भालेकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.