गुहागर – नुकत्याच जाहीर झालेल्या १२वीच्या निकालामध्ये एस.एम. टी. क्लासेस शृंगारतळीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सानिका पवार व प्रतीक पेंडुरकर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सानिका संतोष पवार या विद्यार्थिनीने ७८.६२% गुण घेऊन गुहागर तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला . गणित विषयात सानिकाने ९३ गुण प्राप्त केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आरती मोहिते ,सबा मनियार ,प्रीत वेल्हाळ ई. सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे एस.एम. टी. क्लासेस व युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारताळी चे संचालक प्रा. जहूर बोट ,संस्थापक मा .शब्बीर बोट,पर्यवेक्षिका पल्लवी शेट्ये ,प्रा.प्रफुल्ल इंदुलकर, प्रा. मंदार गोरीवले ई. सर्वांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.