बातम्या शेअर करा

खेड – आज रत्नगिरी जिल्ह्यात 24 तासात 86 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून . सगळ्यात कोविडचा कहर मुंबई- गोवा महामार्गावरील लोटे येथील घरडा कंपनीमध्ये असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
आज घरडा कंपनीचे 16 रुग्ण सापडले असून आता पर्यंत घरडा कंपनी मध्ये एकूण 98 जण कोविड बाधित निघाले आहेत. तर अजून किती निघतील हे सांगता येत नाही.
या कंपनीने आपल्या काही कर्मचारी वर्गाचे स्वब पुण्याला तपासायला पाठवले आहेत. रत्नागिरी येथील सिव्हिल मध्ये जेवढे स्वाब पाठवले जातात तेवढे आपल्या कोविड सेंटर मधून तपासले जात आहेत. तर काही कोविड बाधित लोक कळंबणी येथे दाखल आहेत.
पुण्यात पाठवलेल्या स्वब मध्ये किती अजून पोजिटिव्ह रुग्ण येतात यावरून येथील लोकांची धास्ती वाढणार आहेत.

लोटे येथील घरडा कंपनी ही कोरोना हॉटस्पॉट बनली असुन ही कंपनी तात्काळ बंद करावी अशी मागणी खेड-दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे. ज्यावेळी या घरडा कंपनीत प्रथम कोरोना बाधीत सापडला त्याच वेळेला जर ही कंपनी बंद केली. असती तर घरडा कंपनी हॉटस्पॉट ठरली नसती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे घरडा कंपनी सुरू राहण्यासाठी किंवा घरडा कंपनी बंद पडू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here