गुहागर – मुंढर विद्यामंदिरमधील शिक्षक प्रबोधिनी व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

0
344
बातम्या शेअर करा

गुहागर – डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित गुहागर तालुक्यातील मुंढर येथील श्रीसिध्दीविनायक विद्यामंदिरच्या 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त शिक्षक प्रबोधिनी व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन निवृत्त प्रा. व विभाग प्रमुख सी.औ.इ.पी. प्रा. चंद्रशेखर गाडगीळ व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंटअड बिझनेस हेड, गोदरेज एरोस्पेसचे सुरेंद्र वैद्य यांच्याहस्ते आज शुक्रवारी झाले.

सूत्रसंचालन पराग कदम यांनी केले.या कार्यक्रमाला विशेष अतिथी सेवानिवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, जनशिक्षण संस्थान, रत्नागिरीच्या डायरेक्टर सौ. सीमा यादव, परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरच्या प्रा. सौ. कीर्ती आगाशे, सेवानिवृत्त जी. आय., आय. टी. आय. चिपळूणचे माधव मुसळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नातू प्रतिष्ठानच्या संचालक नीला नातू यांच्यासह संचालक विठ्ठल भालेकर, लक्ष्मण शिगवण, प्रभाकर शिर्के, अजित मस्तान, मुंढर सरपंच आग्रे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तावडे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मानचिन्ह देऊन सौ. नीला नातूयांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सीमा यादव यांनी शिक्षणसम्राटांपेक्षा शिक्षणमहर्षीच्या भूमिकेत असलेल्या या प्रतिष्ठानचे शैक्षणिक कार्य पाहून भारावून गेल्याचे गौरोद्गार काढले. आजच्या मुलांना व्यवसायाभिमुख कौशल्ये शिक्षण देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. कीर्ती आगाशे यांनी आजच्या शिक्षण पध्दतीतील बदल आणि त्याच्या जोडीला मुलांना तांत्रिक शिक्षण देणे महत्वाचे आहे. विद्यार्थीदेशतूनच मुलांना असे व्यवसाय प्रशिक्षण मिळाल्यास पुढे करीअरच्यादृष्टीने सोपे जाईल, असे पटवून दिले. प्रा. चंद्रशेखर गाडगीळ यांनी मुलांना घडविण्यासाठी केवळ शिक्षकी ज्ञान देऊन चालणार नाही तर त्यांना विषयानुरुप कृतीतून काम करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे, असे पटवून देऊन त्याबाबतची विविध उदाहरणे दिली. सुरेंद्र वैद्य यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना त्यामध्ये पारंगत असले पाहिजे. प्रत्येकाने व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन आपली स्वतःची, गावाची व देशाची उन्नती कशी साधता येईल याचा विचार केला पाहिजे. साधे शेतकरी असले तरी त्यातील कामाच्या पध्दती अवगत करुन त्याबाबतचे ज्ञान इतरांना दिले पाहिजे, असे सांगितले.

देशातील युध्दे, सैनिकांचे सैन्यातील योगदान पटवून देताना एअर मार्शल हेमंत भागवत यांनी विद्यार्थ्यांनी सैन्यात जाण्यासाठी कशाप्रकारचे प्रशिक्षण व स्वतःचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे, हे विषद केले. तसेचभारत-चीन युध्द, जर्मनीचा झालेला विध्वंस याच्या आठवणी सांगितल्या. स्वतः मी कसा घडलो याविषयी ते म्हणाले, मी दापोलीच्या केळशी जिल्हापरिषद शाळेतून शिकलो. तरीही एअर फोर्सपर्यंत पोहचलो. आपली मानसिक तयारी, जिद्द तितकीच महत्वाची होती. मला भारतीय सैन्यात जायचे होते मात्र, मी हवाई दलात गेलो. एखादा मार्गावरुन जाताना तोच मार्ग आपल्याला परिपूर्ण असेल असे नाही इच्छा नसूनही तो मार्ग आपल्याला स्वीकारावा लागतो. मात्र, तेथेही आपण प्रयत्न आणि मेहनत घेतली तर दुसऱ्या मार्गावरही आपण यशस्वी होतो. आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास, विचारशक्ती, संयम व जिद्द ठेऊन आपले करीअर निवडल्यास नक्कीच यशस्वी व्हाल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष निला नातू यांनी आज मुंबईसारख्या शहरांची बकाल अवस्था पाहता आपल्या गावातच राहून मुलांनी नोकरी किंवा व्यवसाय करावेत, जेणेकरुन आपले कुटुंब, शेती यांच्याकडेही लक्ष देता येईल, यासाठी प्रत्येकाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगितले. मराठी माणसाने केवळ स्वतःच नोकरी, व्यवसाय न करता आपल्या माणसांना नोकऱ्या कशा देता येतील यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. तसेच आजच्या मुलींनी विवाह ठरवताना मुंबईचाच मुलगा हवा अशी मानसिकता ठेऊ नये असे स्पष्ट कैलै. शहरांपेक्षा गावांचे वातावरण पोषक आहे. त्यामुळे भावी पिढीमे गावांमध्ये नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन आपले करीअर घडवावे असे पटवून दिले. हा कार्यक्रम माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने करण्यात आला. यावेळी स्मृतीगंध हा चर्चासत्र पध्दतीचा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांनी घडवून आणला. तसेच शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक अनंत साठे यांनी केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here