गुहागर – पूर्वीपार परंपरेच्या नावाखाली ज्या परंपरा चालू होत्या त्याला छेद देण्याचे पहिले पाऊल या माऊलीने उचलले आहे. हि दुख:द घटना आहे…. पण समाजाला ह्या घटनेने मोठी दिशा दिली आहे.. या धाडसाचे कौतुक कराव लागेल……लोकनिंदेला न जुमानता घेतलेला निर्णय कुणबी समाजाला दिशा देणारा आणि परिवर्तन शक्तीला बळ देणारा आहे… समस्त नातेवाईक, ग्रामस्थ यांचे हि कौतुक आहे.
गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे, गावातली सलपेवाडी येथील कै. रुक्मिणी पांडुरंग डावल यांचं आज २४ डिसेंबर २०२२ रोजी निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलीच आहेत. त्यामुळे अंत्यविधी कसे करावेत असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी तिथे उपस्थित असणारे ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेचे माजी सरपंच बबन ठीक व वाडीतील सर्व वडीलधारी, जाणकार व महिला यांनी चर्चा करून त्यांच्या मुलीने म्हणजेच सौ.पार्वती अनंत देऊळे यांनी अंत्यविधीचे कार्य पार पाडावे असे ठरविले. तशी प्रत्यक्ष कृती सुद्धा केली. त्याबद्दल बबन ठीक व वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि महिला यांचे तसेच जी माऊली हे अंत्यविधीचं कार्य करायला तयार झाली त्यांचं खरंच खूप कौतुक आहे.
तुम्ही उचललेलं हे क्रांतिकारी पाऊल गावासाठी, संपूर्ण पंचक्रोशीसाठी, कुणबी समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे. सलाम त्या माऊलीला की जिनं हे कार्य करण्यास तयारी दाखवली. आपली आई जाण्याचे खुप मोठं दुःख असताना स्वतःला सावरून आपल्या आईचा अंतविधी स्वतः करायचा निर्णय घेतला त्याला वडिलधारी, वरिष्ठ, स्थानिक गावकरी, नातेवाईक यांनी ना सहकार्य केले त्याबद्दल त्यांच्या परिवर्तनशील कृतीला सलाम..!