युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळीचा एमकेसीएल तर्फे गौरव

0
155
बातम्या शेअर करा

गुहागर – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमकेसीएलच्या सर्व अधिकृत प्रशिक्षण केंद्रांची विभागीय बैठक नुकतीच सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सारख्या ग्रामीण भागात युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरने संगणक साक्षरता आणि संगणक आधारित रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये भरीव कामगिरी केली.तसेच विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेऊन व व्यावसायिक निष्ठा जोपासत युनिटेक कॉम्प्युटर सेंटर च्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा (MS-CIT, Tally, DTP, Advanced Excel, Pragramming, Cyber Security, Robotics, Python, Auto Cad, Soft Skills, Diploma Courses) चा सखोल परिचय व प्रशिक्षण पूर्ण करून दिले व त्यामुळे त्यांना डिजिटल विश्वात प्रगती साधण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला. तसेच या केंद्रामधून शिकलेले बरेच विद्यार्थी आज विविध ठिकाणी नोकरी व व्यवसाय करीत आहेत.युनिटेक कॉम्प्युटरच्या या भरीव योगदानाबद्दल एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका मा.विना कामत मॅडम यांच्या हस्ते मा. केंद्र संचालक प्रा. जहूर बोट यांना अतुल पतोडी,अमित रानडे, विकास देसाई, नटराज कटकदोंड,जयंत भगत,मंगेश जाधव, संतोष कोलते, प्रणय तेली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे या गौरवाबद्दल व यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here