गुहागर – गुहागर तालुक्यातील एकूण 21 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकिसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला सरपंच पदासाठी एकूण 51 अर्ज तर सदस्यपदासाठी सुमारे 252 अर्ज प्राप्त झाले आहेत.
मात्र एकूण किती अर्ज शिल्लक राहणार हे छाननीनंतर स्पष्ट होणार आहे.तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे.यासाठी विविध पक्ष आपले गावातील तसेच तालुक्यातील अस्तित्व दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.काही ठिकाणी गाव विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूका लढवल्या जाणार आहेत.तालुक्यातील एकूण 21 ग्रामपंचायती निवडणूकांसाठी सज्ज झाल्या आहेत.यामध्ये आरे,आबलोली, कोतळूक, कौंढर-काळसूर,खोडदे,चिखली, जानवळे,धोपावे, वरवेली,हेदवी आवरे-असोरे,झोंबडी, पाली,पालकोट-त्रिशूळ,पांगारी तर्फे हवेली,पोमेंडी-गोणवली,मढाळ,वडद, साखरी-त्रिशूळ,सडे-जांभारी,पाटपन्हाळे आदि ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी आरे 4,आबलोली 3,कोतळूक 1,काळसूर-कौंढर 3,खोडदे 3,चिखली 4, जानवळे 3, धोपावे 4, वरवेली 2, हेदवी 2,आवरे-असोरे 1,झोबंडी 3, पाली 1,पालकोट-त्रिशूळ 1,पांगारी तर्फे हवेली 3,पोमेंडी-गोणवली 1,मढाळ 1, वडद 1,साखरी-त्रिशूळ 1,सडेजांभारी 3,पाटपन्हाळे 6 असे एकूण 51 अर्ज सरपंच पदासाठी प्राप्त झाले आहेत.तर सदस्यपदासाठी आरे 17,आबलोली 15,कोतळूक 10,काळसूर-कौंढर 12,खोडदे 15,चिखली 10, जानवळे 18, धोपावे 10, वरवेली 12, हेदवी 17,आवरे-असोरे 7,झोबंडी 13, पाली 7,पालकोट-त्रिशूळ 7,पांगारी तर्फे हवेली 15,पोमेंडी-गोणवली 14,मढाळ 7 , वडद 7,साखरी-त्रिशूळ 6,सडेजांभारी 8,पाटपन्हाळे 25 अर्ज प्राप्त झाले आहेत.मात्र अर्ज छाननीनंतर अंतिम उमेदवार किती हे चित्र स्पष्ट होणार आहे.