गुहागर – गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व शास्त्र महाविदयालयात वाणिज्य मंडळ आणि करिअर गायडन्स विभागातर्फे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनासंदर्भात एकदिवशीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या परिक्षेत आयपीएस म्हणून उत्तीर्ण झालेले स्वप्निल माने आणि महाराष्ट राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले व सध्या जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे लेखाधिकारी म्हणून कार्यरत असणारे उमेश मगदुम उपस्थित होते. त्यांनी करिअर कसं करावं याबाबत उपस्थितांना आपण कसे घडलो याची माहिती सांगितली ती माहिती ऐकताना अनेकांच्या अंगावर शहारे देखील आले त्यामुळे मेहनत घेतली की फळ मिळतं हेच यांच्या व्याख्यानातून पुढे आले.
सेमिनारच्या सुरुवातीला उमेश मगदुम यांनी स्पर्धा परिक्षांचे स्वरूप कसे असते व विदयाथ्र्यांनी कशा प्रकारे तयारी करावी हे सांगितले. त्यानी आपला प्रवास छोटयाशा खेडेगावातुन सुरू केला व अत्युच्च अशा शिखरावर कशा प्रकारे जावुन पोहोचले तसेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असूनदेखील कशा प्रकारे यश मिळविले हे स्पष्ट केले.
आपल्या मार्गदर्शनामध्ये आयपीएस अधिकारी स्वप्निल माने यांनी आपले प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण कसे पार पाडले याची माहिती देताना घरच्या अडचणीमुळे कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले याची माहिती दिली. आर्थिक अडचणीमुळे पैशासाठी फळविकायच्या स्टॉलवरदेखील काम करून आपण आपले शिक्षण करो पुर्ण केले चाबी माहिती देवून फळ विक्रेता ने आयपीएस अधिकारी अगा आपला प्रवारा कसा झाला हे सांगितले, त्यामुळे विदयार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यश मिळणार नाही हे स्पष्ट केले. शिक्षण घेताना आपले आदर्श हे आपले आईवडिल, गुरूजन किंवा महान व्यक्तिमत्वच असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कॉलेज जीवनापासून आपली स्पर्धापरिक्षेची तयारी केल्यास भविष्यात चांगले यश मिळु शकते हे स्पष्ट केले. सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर यामुळे विदयार्थी आपल्या ध्येयापासून बाजुला जात आहे त्यामुळे गुणवत्ता असूनदेखील हुशार विद्यार्थी मागे पडतात त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर कसा करावा हे देखील त्यानी सांगितले. विदयार्थ्यांनी आपल्या क्षमता सर्वप्रथम ओळखाव्यात व त्यानुसार मार्गक्रमण केल्यास यश मिळविणे अवघड नसते हे त्यानी विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले. स्पर्धा परिक्षा देताना सुरुवातीला अपयश येवु शकते परंतु त्यावर मात करून प्रयत्न केल्यास निश्ति यश मिळू शकते हे सांगितले, स्पर्धा परिक्षेची तयारी करताना दररोज कशा प्रकारे अभ्यासाचे नियोजन करावे आणि किती वेळ अभ्यास करावा व अभ्यासाचे स्वरूप कसे असावे हे त्यांनी सांगितले. पुस्तकांची निवड कशा प्रकारे करावी याची माहीती देवुन क्लासचा विचार न करता आपण स्वता अभ्यास केल्यास अधिक चांगल्या प्रकारे यश मिळते हे सांगितले. एम पी एस सी आणि यु पी एस सी यातील फरक स्पष्ट करून त्यातील कोणत्या परिक्षावर लक्ष केंद्रित करावे याची माहिती दिली. या परिक्षांचा शेवटचा टप्पा मुलाखत असतो तो त्यांनी आपल्या अनुभवाची माहिती देवून त्याची तयारी कशा प्रकारे करावी याचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांनी विदयार्थ्याच्या विविध प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणाली देर्देकर हिने तर समारोप कु कोमल झिंबर हिने केला. या कार्यक्रमाला पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, प्राचार्य पी ए देसाई, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. खोत एस एस प्रा. लंकेश गजभिये, प्रा सनये पी टी व भागवत पी एस महाविदयालयाचा जी एस कु प्रणव टाणकर उपस्थित तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..