गुहागर – घरातून बेपत्ता झालेल्या पालकोट त्रिशूल पारदळेवाडीतील वृद्धेचा मृतदेह १७ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळला.
सुमित्रा जनार्दन पारदळे असे या वृद्धेचे नाव असून, हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.सुमित्रा पारदळे या १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता घरातून बाहेर पडल्या होत्या. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. पेवे, खामशेत, पारदळेवाडी ग्रामस्थ २ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गोठणे पऱ्यावर स्वच्छतेसाठी गेले होते. त्यावेळी सुमित्रा पारदळे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. अमित अनंत पवार (पवारसाखरी खुर्द) यांनी ग्रामस्थांना सांगितल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.