गुहागर ;भाजपची दहा वर्षाची सत्ता संपुष्टात

0
665
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागरमध्ये भाजपच्या ताब्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला गेली दहा वर्ष भाजपच्या ताब्यात असलेली अंजनवेल ग्रामपंचायत एकतर्फी ताब्यात घेत तालुक्यात भाजपचा सुपडा साफ करण्यात शिवसेनेला यश आले.

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर गुहागर मध्ये सुद्धा या घडामोडी घडतील असे जाणकार सांगत होते मात्र असं असलं तरी आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या विकास कामाला नागरिकांनी मतदान करत गेले दहा वर्ष भाजपच्या ताब्यात असलेली अंजनवेल ग्रामपंचायत सुद्धा शिवसेनेच्या ताब्यात देऊन एक प्रकारे त्यांच्या विकास कामाची पोचपावती दिल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज 35 ग्रामपंचायतीचा निकाल लागला यामध्ये गुहागर तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम असल्याचे दिसले. गुहागर तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाचा सुपडा साफ करत गुहागरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भगवा फडकवला आहे.

गुहागरमध्ये भाजपच्या ताब्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. अंजनवेल आणि वेलदूर मध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे. दिव्या सुमित वनकर वेलदुर सरपंच,तर सोनल रामनाथ मोरे अंजनवेल सरपंच म्हणून निवडून आले आहे.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल आणि वेलदूर या ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्ष भाजपचा एकतर्फी वर्चस्व होतं मात्र या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here