गुहागर – चिपळूण तालुक्यात राष्ट्रीय पोषण अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा हा उपक्रम विविध पध्दतीने साजरा होत आहे.
नुकताच कात्रोळी अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण महाअभियान हा कार्यक्रम संपन्न झाला. कात्रोळी अंगणवाडीमध्ये या अभियांना अंतर्गत रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये गावातील अनेक ग्रामस्थ आणि महिला मंडळानी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद केंद्र्शाळा प्रमुख कदम, ग्रा.पं. सदस्य संजीवनी कलमुंडकर तसेच शिवानी शिंदे, नेहा नाथव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कात्रोळी अंगणवाडी केंद्र व सेविका समीक्षा जाधव, समिधा पावसकर, मनस्वी देसावी, रेश्मा निवळकर यांनी विशेष मेहनत घेऊन हा हा कार्यक्रम यशस्वी केला.