गुहागर ; विसर्जनासाठी गेलेला कोळवलीतील तरुण अद्याप बेपत्ता

0
212
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील कोळवली गावातील 35 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी तो गणपती विसर्जनासाठी जयगड खाडी किनाऱ्यावर गेला होता.

ग्रामस्थ सदर तरुणाचा शोध घेत असून समुद्रकिनाऱ्याकाठच्या गावांमध्येही शोध मोहिम सुरु आहे. महेश कृष्णा भुवड असे बेपत्ता तरुणाचे नावं आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी महेश ग्रामस्थांसह कोळवलीत जयगड खाडी किनारी गणपती विसर्जनासाठी गेला होता. यावेळी महेश पाय घसरुन खाडीत पडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार महेशला पोहता येत नव्हते. महेश बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी खाडी किनारी शोध घेतला. मात्र रात्री पर्यंत महेश न सापडल्याने अखेर या घटनेची खबर गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आली. महेश भुवड बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलीसांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here