गुहागर – गुहागर तालुक्यात आम . भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुका एकसंघ असून .. आम जाधव यांनो तालुक्यात केळेल्या विकासकामांमुळे . अन्य पक्षातील कार्यकर्तेही प्रभावीत झाले आहेत .
सेनेच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मजबूत एकजूट असून तालुक्यातील एकही कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नसल्याचा निर्वाळा सेनेचे गुहागर तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी दिला आहे.भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी . नियुक्ती झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांत आणखीन बळ वाढले आहे; असे सांगून सचिन बाईत म्हणाले की सेनेच्या उध्दव साहेब ठाकरे यांनी योग्य व अचूक निर्णय घेतला आहे . विधानसभा निवडणूकांना अजून वेळ आहे; परंतू आमदार साहेबांनी त्या पूर्वीच सर्व जिल्हा परिषद गटात मेळावेघेऊन सेनेची गुहागर तालुक्यात मजबूत बांधणी केली आहे. . . विकास कामें करतांना यांनी कधीही पक्ष व समाज पाहिला नाहीं . रस्ते आरोग्य शिक्षण या बरोबरच प्रत्येक गावातील आवश्यक गरजा ओळखून त्यांनी त्या पूर्ण करण्या साठा प्रामाणिक प्रयत्न केले आहेत; त्यामुळे त्यांच्या कामावर इतर पक्षातील कार्यकर्तेही प्रभावीत . होत आहेत . साहेबांनी तालुक्यातील वाडी वस्तीवर भेट देऊन संपर्क ठेवला आहे.
कोविड काळात गुहागरच्या चाकरमान्यां ना त्यांनी दिलेला दिलासा व धीर कोणीही विसरलेले नाही . म्हणूनच तालुक्यात सोडाच परंतू आमदारां – च्या मुंबईतल्या सभेसाठी वत्यांना भेटण्यासाठी शेकडो कार्यकर्ते गर्दी करतांन दिसत आहेत .आम भास्कर जाधव यांचा कामाचा आवाका मोठा असून त्यांना म्हणूनच सेनेच्या नेतेपदी नेमण्यात आले आहे. त्यापदाला ते योग्य असून ते त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे . सचिन बाईत पुढे म्हणाले की गुहागर तालुक्यातील सर्व पं.स व जि.प. सदस्य यांनी उत्कृष्ट काम केळे असून आगामी काळात ग्राम पंचायत व जिल्हा परिषद; पंचायत समिती यावर शिवसेनेचे वर्चस्व दिसे ल यात शंका नाहीं .आम भास्कर जाधव हे गुहागर तालुक्याचे सर्वमान्य नेतृत्व असून त्यांना सद्यां तरी पर्याय नाही असे सांगून श्री बाईत म्हणाले की सर्व पदाधिकारी यांच्या जवळ त्यांचे घरोब्याचे संबंध असून त्यांच्या जवळ चांगला संवाद आहे; त्यामुळे कोणीही कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नाहीं असा विश्वासही सचिन बाईत यांनी व्यवत्त केला आहे