गणपती डेकोरेशन करणाऱ्या तरुणाचा शॉक बसून मृत्यू

0
519
बातम्या शेअर करा

खेड – गणरायाच्या आगमना ला अवघा एक दिवस शिल्लक असताना गणपती चे डेकोरेशन करत असताना इलेक्ट्रॉनिक विजेचा अचानक लागलेल्या धक्क्याने ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आयनी शेरी घागुर्डेवाडी येथे घडली असल्याची घटना पुढे आली आहे.

उपलब्ध माहिती नुसार रुपेश रघुनाथ जाधव असे त्या मृत्यू झालेल्या तरुणा चे नाव आहे ३० ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास रुपेश हा आई , दोन मुले, पत्नी यांच्या मदतीने राहत्या घरी गणपती सजावटीसाठी डेकोरेशन करत होता अचानक इलेट्रीक विजेचा शॉक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढावला असा प्राथमिक अंदाज आहे त्याला अधिक उपचारासाठी लोटे येथील परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी त्याची प्राणज्योत मालवल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले दरम्यान या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here