गुहागर – सुमारे वीस गुरे- वासरे, डझनभर श्वान – मांजरे यांना आयुष्यभर पोसून त्यांना जिवापाड जपणारा एक अवलिया तलाठी नुकताच निवर्तला.
त्याच्या जाण्याने अन्य कोणीही पोरके झाले नसले तरी, घरात असलेले पाळीव प्राणी मात्र आता अनाथ झाले आहेत.किसन गंगाराम मोरे उर्फ केजी (६७) असे या अनोख्या माणसाचे नाव आहे. पाटपन्हाळे हायस्कूल मधून १९७०-१९७४ चा अकरावी पास हा विद्यार्थी, पहिल्यापासूनच एकाकी जीवन जगत होता. शाळेत इतर मुलांमध्ये ही मिसळत नसे. शाळा सुटल्यानंतर चार किलोमीटर दूर असलेल्या आपल्या घरात तो सर्वांच्या आधी परतलेला असायचा. मॅट्रिक झाल्यानंतर ते तलाठी म्हणून रुजू झाले अनेक गावच्या तलाठी पदावर त्यांनी काम केले. तलाठी भाऊ म्हणूनच लोक त्यांना ओळखत.पहिल्यापासूनच गुरे, श्वान, मांजरे सांभाळण्याचा त्यांचा छंद होता. तसा तो अनेकांना असतो, परंतु या पाळीव प्राण्याचे व किसन गंगाराम यांचे नातेच अजब. त्यांना कोणी सखा भाऊ किंवा बहिण नव्हती. पण त्यांच्या जीवनात या पाळीव प्राण्यांना त्यापेक्षाही मोठे स्थान होते. हा त्यांचा परिवार होता. गायी, वासरे, धष्टपुष्ट बैल असे वीस जनावरे होती. परंतु गाईचे एक कप दूधही त्यांनी आपल्या चहात घातले नाही. ते दूध वासरांचे आहे त्यावर त्यांचाच अधिकार असे ते म्हणायचे.नोकरी संपल्यावर हातात काही शिल्लक नव्हते ते गावात मंजुरीला जायचे त्यांनी नवीन घर बांधले पण त्या अख्या घरात गुरे व कुत्री ते स्वतः एका पडवीत असायचे. अख्या घरात गुरे असायचे त्यांना धावे बांधायची सोयच नव्हती या अवलियाचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे त्यांनी जीवापाड सांभाळून असा खूप मोठा परिवार अनाथ झाला आहे.बैल लगेच परत आणला.त्यांच्याकडे नष्ट गोष्ट गुरविकात देण्यासाठी अनेकजण त्यांना गोळा घालायचा परंतु त्यांनी दाद लागू दिली नाही. शेजारच्या गावातल्या एका शेतकऱ्याने एका बैलासाठी त्यांना ओळखले. अखेर काही अटींवर त्यांनी बघितलेला परंतु तो गेल्यानंतर दोन दिवस त्यांना झोप आली नाही दुसऱ्या दिवशी दोन गडी घेऊन ते त्या शेतकऱ्याकडे गेला त्या शेतकऱ्याने नांगर धरला होता व त्यांच्या हातात काठी होती भाऊ आलेला समजला आता बैलाने हंबरडा फोडला शेतात बांधावर बसून तेही रडू लागले बैलाला नांगरायला जिंकल्याबद्दल ते शेतकऱ्यावर चिडले शेतकऱ्यांना दिलेला पैसा चे अधिक पैसे देऊन ते बैल परत घेऊन आले.