गुहागर – पाटपन्हाळे कला, वाणिज्य व शास्त्र महाविदयालयात वाणिज्य मंडळाचे उदघाटन नुकतेच महाविदयालयाचे माजी विद्यार्थ्या तसेच लोकप्रिय असणा-या कोकणी कार्टीचे संस्थापक व महाराष्ट्र पोलिस सेवेत असणा-या प्रितेश रहाटे व अमित कुबडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमात विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतामध्ये प्रितेश रहाटे यांनी आपण कशा प्रकारे करिअरची सुरुवात केली व शेवटच्या बेंचवरील विदयार्थी ते पोलिस दलातील करिअर कशा प्रकारे केले हे स्पष्ट केले.
महाविदयालयात असताना आपण कोणत्या चुका केल्या त्यामुळे करिअर करताना कोणत्या अडचणी आल्या है सांगितले. त्यामुळे सुरुवातीपासून करिअर कसे निवडावे व त्याचे मार्गक्रमण कसे असावे हे स्पष्ट केले. विदयार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखल्यास करिअर करणे सोपे जाते है विविध उदाहरणाच्या आधार सांगितले. कॉलेज करताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टीला महत्व दयावे हे सांगुन विविध उपक्रमामध्ये विदयार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा हे सांगितले. विदयाथ्यांनी पदवी शिक्षण घेताना करिअरचे विविध मार्ग लक्षात घ्यावेत हे सांगितले, यासाठी कॉलेजच्या वाणिज्य मंडळाचाच विविध घटकांचा वापर कसा करावा हे त्यानी सांगितले. तसेच सध्याच्या काळात सोशल मिडी आचा वापर कसा करावा व त्याचा वापर किती प्रमाणात करावा हेदेखील सांगितले. अमित कुबडे यांनीदेखील आपल्या मार्गदर्शनामध्ये विदयार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता विविध व्यवसायाचा विचार केल्यास मुंबई मध्ये न जाता गुहागरमध्ये राहून देखील करिअर कसे घडविता येते हे विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले. तसेच महाविदयालयाच्या वाणिज्य मंडळाना व महाविदयालयाला आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले, वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून कुटाणकर प्रणव यांची तर सचिव म्हणून मृणाली देदकर यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणुन कोमल झिंवर, राज साळवी, अदनान मुजावर, अभिषेक गोणवरे, दिनी कावणकर, ईश्वरी संसारे, दिक्षा चव्हाण, ऋतुजा साळवी, साहिल गंगळे, रोहन दवंडे, कनिष्का देवळेकर यांची निवड करण्यात आली. या वाणिज्य मंडळामार्फत वर्षभर विदयार्थ्यासाठी विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वाणिज्य मंडळातील सर्व पदाधिका-यांचा सत्कार प्रितेश रहाटे व अमित कुबडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. मृणानी देर्देकर हिने तर समारोप कोमल झिंबर हिने केला. या कार्यक्रमाला प्राचार्य देसाई पी ए वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. खोत एस एस प्रा. लंकेश गजभिये, प्रा सनये पीटी, जे एस जाधव व भागवत पी एस उपस्थित होते.