गुहागर – गुहागर तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथे अतिशय धक्कादायक अशी घटना घडली उसने दिलेले पैसे परत मागितल्याने राग येऊन डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.
तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथील अनंत तानु मांडवकर – वय – 48 व सुनील महादेव आग्रे – हे दोघे शेजारी असून एकाच वाडीत राहतात गेले अनेक वर्ष हे दोघं एकत्र कामालाही जातात त्याच कामांमध्ये दोघांची पैशांची व्यवहारांची देवाणघेवाण होत असे मात्र काल सायंकाळी दारू पिऊन मयत अनंत मांडवकर याने सुनील आग्रे यांच्या घरात जाऊन तुला दिलेले उसने पैसे परत दे असा कांगावा केला त्याचा राग येताच सुनिल आग्रे यांनी घराजवळ असलेली कुऱ्हाड घेऊन मयत व्यक्तीच्या डोक्यात तीन वेळा मारले त्याच वेळी ही व्यक्ती जागेवरच मयत झाली मात्र सकाळी ही व्यक्ती परत आली नाही. ज्यावेळेला शोधाशोध झाली त्यावेळेला ही व्यक्ती जवळ असलेल्या घराशेजारी सापडल्याने एकच खळबळ मारली यानंतर गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी केली असता आरोपी सुनील आग्रे हा घरा शेजारचा निघाला आणि त्यांनी मी रागाच्या भरात डोक्यात कुराड मारल्याचे पोलिसांच्या समक्ष कबूल केले गुहागर पोलिसांनी ही माहिती समजतात पुढील ऐका तासात आरोपीला शोधल्याने गुहागर पोलिसांच्या सर्वत्र कौतुक होते.
घटनेची माहिती समजतात गुहागर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच आजूबाजूचा परिसर तपासण्यास सुरुवात केली त्यावेळी एका व्यक्तीवर संशय येतात नव्याने रुजू झालेले तुषार पाचपुते यांनी आपल्या चाणाक्ष नजरेने आरोपीला हेरले आणि पुढील एका तासात आरोपीला कुऱ्हाडसह ताब्यात घेण्यात त्यांना यश आले त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे गुहागर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते. गुहागर पोलीस स्थानकाचे तुषार पाचपुते, वैभव चौगुले, प्रतीक राहटे, हणमंत नलावडे, आनंदराव पवार, आधी सहकारी हजर होते.