चिपळूण – चिपळूण शहरानजिकच्या कामथे येथे स्वामिनी पेट्रोलियम या नवीन पेट्रोल पंपाचा मंगळवार दि. २३ रोजी सायंकाळी ६ वाजता शुभारंभ होत आहे. या पंपाचे उद्घाटन इंडीयन ऑईलचे मंडल रिटेल सेल्स गोवा प्रमुख सुनिल कांत महारणा, वरिष्ठ व्यवस्थापक(सीसी ॲन्ड आरएस) गोवा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आशिषकुमार जैन व चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना ते प्रसिद्ध आर्कीटेक्ट ओळखले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिष्ठी मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्टस्च्या प्रकल्पाची पिंपळी खुर्द येथे मुहुर्तमेढ रोवली आहे. या प्रकल्पाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर सुरु असून लवकरच हा प्रकल्प सुरु होईल. तर दुसरीकडे कामथे येथे इंडीयन ऑईलच्या स्वामिनी पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे काम सुरु होते. या पेट्रोल पंपाचे काम पुर्णत्वास गेले असून हा पेट्रोल पंप मंगळवार दि. २३ रोजी सेवेत रुजू होत आहे.
या पेट्रोल पंपाच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी, तहसिलदार जयराज सुर्यवंशी, कामथे सरपंच डॉ. विजय माटे, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रकाश निगडे, स्टेट बँक ऑफ इंडिया बहादूरशेख शाखा शाखाधिकारी संतोष वाडकर, आयओसीएल रत्नागिरी असिस्टंट मॅनेजर विशाल झोपे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव व कु.स्वामिनी यादव यांनी केले आहे.