चिपळूण – चिपळूण तालुक्यातील ग्रामस्थांनच्या अडीअडचणी सोडवता यावेत म्हणून चिपळूणचे आमदार शेखर निकम आता दर सोमवारी जनता दरबार घेणार आहेत.
चिपळूण शहर व परिसरातील नागरिकांना भेटता यावे, आपली गाऱ्हाणी मांडता यावीत, आपले प्रश्न मांडता यावे, यासाठी आता १ ऑगस्टपासून दर सोमवारी आमदार शेखर निकम सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नागरिकांना भेटणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील आमदार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयात ते नागरिकांचे प्रश्न समजून घेणार आहेत, त्यांना भेटणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहरप्रमुख मिलिंद कापडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, शिरीष काटकर, सतीशअप्पा खेडेकर यांच्यासह पालिकेतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.