“झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए”दापोलीतील घडवलेकडून बचत गटातील महिलांची फसवणूक

0
264
बातम्या शेअर करा

गुहागर – “झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए” या वाक्याचा प्रत्यय गुहागर तालुक्यातील शृंगारतळी परिसरातील बचत गटाच्या महिलांना आणि इतरांनाही चांगलाच आला आहे आणि हा चमत्कार दापोलीतील अगरबत्ती व्यावसायिक घडवले याने घडवला असून गुहागर पोलिसांनी आपला चमत्कार त्याला दाखविला आहे.

दापोलीमध्ये रहिवाशी असणारा सुनील घडवले हा अगरबत्तीचा व्यवसाय करतो. तो लोकांकडून पैसे घेऊन त्यांना अगरबत्तीसाठी लागणारा माल पुरवतो. शृंगारतळी परिसरातील अनेक बचत गटाच्या महिलांकडून माल पुरविण्यासाठी त्याने योग्यरीत्या माल पुरविला म्हणून याच परिसरातील काही सुशिक्षित लोकही याचे शिकार झाले. लाखो रुपये बचत गटांच्या महिलांकडून गुंडाळून घडवलेने या “महिलांना ठगवले” नाईलाजास्तव घडवलेचा शोध घेण्यास सुरुवात केली गेली व त्याचा दापोलीचा पत्ता मिळाला. परंतु त्या पत्त्यावर तो राहत नसून अनेक ठिकाणे बदलत होता. हैराण झालेल्या महिलांनी शेवटी गुहागर पोलीस ठाण्यात घडवलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि गुहागर पोलिसांनी दापोली पोलिसांच्या मदतीने सापळा रचून घडवलेला पकडले व गुहागर पोलीस ठाण्यात आणले. पैसे गुंतवणारे सर्वजण गुहागर पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे घडवलेने १० जूनपासून रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसे त्याने प्रतिज्ञा पत्रावरच लेखी देऊन प्रत्येकाला पंधरा – पंधरा दिवसाच्या अवधीचे धनादेश दिले .१० जून उलटून १० जुलै आली. परंतु  त्या कालावधीत दिलेले धनादेशही खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे “बाउन्स” झाले. त्यामुळे आता त्रस्त महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. घडवलेने घडवलेल्या कहाणीचा फटका येथील बचत गटातील महिलांना बसला आहे. या एवढ्या मोठ्या रकमेची वसुली करणार कुठून ? एवढी मोठी लाखो रुपयांची रक्कम कुठून उभी करणार, या विचाराने बचत गटातील महिला ग्रासल्या आहेत. हाच घडवले धनादेश न वटल्यामुळे पुन्हा कायदयाच्या कचाट्यात अडकणार एवढे मात्र निश्चित ! त्याने नोटरी लिहून दिल्यानंतर पोलिसांनी त्याला काही अटींवर सोडले असले तरी पोलीस त्याच्यावर बारीक नजर ठेवून असणारच. मात्र या महिलांना न्याय मिळावा यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेनेही लक्ष द्यावे असे महिलांकडून बोलले जात आहे.चौकट : बचत गटातील सर्व महिला एकत्र येऊन एकत्रितरीत्या पुन्हा तक्रार करणार असल्याचे येथील महिलांमधून चर्चा सुरु आहे. या घडवलेच्या चक्रव्यूहात शृंगारतळी परिसरातील बचत गटामधील अनेक सावित्रीच्या लेकींचे लाखो रुपये अडकले आहेत. 


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here