चिपळूण – भूमि अभिलेख उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार सुरू असून त्याबाबत संबंधित विभागाच्या नवनिर्वाचत अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये खाजगी मुले मुलींचा भरणा करून नकाशे तयार करून दिले जात आहे. तसेच मोजणी कामे भूमापकाबरोबर गावोगावी जाऊन खाजगी स्वरूपात शासकीय आदेशानुसार प्लॅन टेबलवर मोजणे सुद्धा करत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला असून या कार्यालयात सुरू असणाऱ्या अनागोंदी कारभाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे , अशी मागणी जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते यांनी केली आहे. यासंदर्भात संदेश मोहिते त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.की, जमीन व्यवहारासाठी हॉटस्पॉट असलेल्या चिपळूण भूमी अभिलेख कार्यालयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. येथे जमिनीचा नकाशा आणि इतर कागदपत्राची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये जमिनीचा व्यवहार करणाऱ्या दलालांचा या कार्यालयात रेकॉर्ड रूमपर्यंत वावर असतो. दलालांच्या हातात जनतेचे रेकॉर्ड देणे म्हणजे हे तांत्रिक दृष्ट्या बेकायदेशीर व बेजबाबदार म्हणायचे आहे. बाहेरून लोकांच्या हातात किंवा दलालाच्या हातात रेकॉर्ड देऊन नकला करणे. या बाबींमुळे भविष्यात कोणत्याही नकाशाच्या रेषा सुद्धा बदलू शकतात त्यामुळे जनतेचे अतोनात नुकसान होणार आहे भूमी अभिलेख कार्यालयात प्रवेश केल्यानंतर दलाल एजंट यांचा वावर खाजगी स्वरूपात ठेवलेल्या मुले मुलींचा भरणा हे दृश्य पाहिल्यानंतर असे वाटते, हे कार्यालय कोणाचे तरी खाजगी मालकीचे असावे कारण अधिकृत असणारे कर्मचारी आपल्या आसनावर आसनस्थ नसतात. त्या ठिकाणी कार्यरत असणारे खाजगी लोक किंवा दलाल हेच या कार्यालयाचा कर्मचारी असल्याचे लोकांपर्यंत पसरवण्यात आल्याचे दिसून येते. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि जनतेचे दस्तावे सुरक्षित रहावे ही अपेक्षा ही मोहिते यांनी केले आहे.

















