नांदेडमधील भक्ताकडून विठ्ठल-रखुमाईसाठी कोट्यवधीचे दोन सुवर्णमुकुट; आषाढी एकादशीला अर्पण करणार

0
89
बातम्या शेअर करा

पंढरपूर- नांदेड जिल्ह्यातील उमरीचे माजी नगराध्यक्ष आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मुर्तीला दोन सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. त्या अनुषंगाने आषाढी एकादशीला तो पूर्णत्वास जाणार आहे. एकूण १ हजार ९६८ ग्रँम शुद्ध सोन्यापासून मुकुटांची निर्मिती करण्यात आली आहे. या मुकुटांची किंमत १ कोटी ३ लाख रुपये आहे.

विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार सराफ ह्यांच्या कडून हे मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत. विजयकुमार व जयश्री उत्तरवार समवेत त्यांचे सुपुत्र ओमकार, अरविंद, अजय, अच्य्युत व डॉ. अनंत उत्तरवार या कार्यक्रमावेळी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विजयकुमार उत्तरवार यांनी हिंगोली येथे डॉ. विजय नीलावार यांच्या निवासस्थानी दिली.

कोरोनाच्या सुरुवातीला विजयकुमार उत्तरवार यांनी उमरी न. प. सरकारी दवाखाना व पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांच्या कार्यागौरवार्थ लाखो रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचा व कुटुंबीयांचा सत्कार त्यांचे भाचे डॉ. विजय नीलावार यांनी केला. या कार्याचं वारकरी संप्रदायकडून कौतुक होत आहे. नांदेड येथील हे उत्तरवार कुटुंब उद्या विठुरायला १ कोटी रुपयांचे दोन सुवर्ण मुकुट अर्पण करणार आहेत. त्यांना ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठल मंदिराला द्यायचे आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here