चिपळुणात मगरींचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल

0
56
बातम्या शेअर करा

चिपळूण – गेल्या काही दिवसांत चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचा वावर वाढला आहे. अशातच गोवळकोट रोड येथील ‘मगर पॉईंट’च्या ठिकाणी देखील मगरींची संख्या वाढली आहे.

या भागात मगरी रात्रीच्यावेळी चक्क रस्त्यावरच मुक्तसंचार करताना दिसतात. सोमवारी रात्री काही नागरिक गोवळकोट रस्त्याने जात असताना त्यांनी रस्त्यावर आलेल्या मगरीचे चित्रण केले. गोवळकोट चर येथे एकाच ठिकाणी मगरींची संख्या अधिक आहे.शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचे प्रमाण वाढले आहे. अगदी रहदारी असलेल्या बाजारपूल व शिवनदी पुलानजीक भल्या मोठ्या मगरींचे दर्शन नेहमी होते. त्यातच आता मगरींच्या पिल्लांचे प्रमाणही वाढले आहे. या दोन्ही नद्यांमध्ये जागोजागी मगरी दिसू लागल्या आहेत. आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शहरातील गोवळकोट तर येथे कायम मगरी असतात.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here