चिपळूण – चिपळूण शहरातील शासकीय गोदामात गोर- गरिबांनसाठी आलेली लाखो रुपयाची तूर डाळ सडत पडली असल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शहरातील शासकीय गोदामात हजारो क्विंटल तूर डाळ गेल्या वर्षभरापासून पडून आहे. जर हजारो रुपयाची तूर डाळ गोदामात होती तर तिचं वाटप का करण्यात आली नाही. असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लाखो रुपयाची ही तूरडाळ खराब होण्यासाठी जे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. याबाबत येथील गोदाम व्यवस्थापक यांच्याकडे संपर्क साधला असता आम्ही त्या तूरडाळी बाबत वरिष्ठांना लेखी कळविले असल्याचे त्यानी सांगितले. मात्र असं असलं तरी गेल्या वर्षभरापासून या गोदामात आसलेल्या तूरडाळ बाबत प्रशासन गप्प का असा सवाल आता सर्वच नागरिक करत आहेत.
एकीकडे चिपळूण शहरातील आलेला पूर आणि कोरोनाची दुसरी लाट अशी स्थिती असताना यामध्ये ही तूरडाळ वाटप तर केली असती अनेक गोरगरिबांना त्याचा उपयोग झाला असता. मात्र असे असूनही वाटप न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.