गुहागर ; मुलाचे लग्न होत नाही म्हणून आईची गळफास घेऊन आत्महत्या

0
91
बातम्या शेअर करा

गुहागर- गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथे पोटच्या मुलांच लग्न व्हावं, संसार उभा रहावा यासाठी आईने बरेच प्रयत्न करूनही लग्न जमत नसल्याने नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

भार्गिथी गोविंद आंबेकर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे . गुहागर पोलीस ठाण्यात या बाबतची नोंद करण्यात आली आहे. आंबेकर या सोमवारी 13 जुन दुपारी 3.30 वाजल्यापासून बेपत्ता होत्या. मंगळवारी सकाळी १० वा. किंजळीच्या झाडाला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. भार्गिथी, त्यांचा मुलगा व मावशी असे तिघेजण एकत्र राहत होते. मुलाचे लग्न जमत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचललं. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here