दापोली ; हर्णै पाजपंढरी मार्गावर ट्रकला लागली आग

0
65
बातम्या शेअर करा

दापोली – हर्णै येथे पाजपंढरी कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.


हर्णै पाजपंढरी मार्गावर गेले कित्येक दिवस श्रीवर्धन (रायगड) तालक्यातील MH-06- BG- 4203 या नंबर चा एक मासळी वाहतुकीचा ट्रक उभा होता. आज अचानक दुपारी दीडच्या सुमारास या ट्रकला आग लागली. ताबडतोब पोलिसांना खबर देण्यात आली. हर्णै दुरक्षेत्राचे बीटअंमलदार श्री. दिलीप गोरे, पोलीस सुशील मोहिते, दिलीप नवाले घटनास्थळी हजर झाले.
ही आग कशी लागली याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. हा ट्रक रस्त्याच्या एका बाजूलाच गेले कित्येक महिने बंद अवस्थेत उभा केलेला होता. ज्या ठिकाणी उभा होता त्याठिकाणी मोकळ शेत असून या शेतात असणाऱ्या सुक्या गवताला अगोदरच वणवा लागला होता. सदरचा वणव्यामुळे देखील आग लागली असावी; असे प्रथम दर्शनी पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. आग लागताच एक बाजूला असणाऱ्या घरामधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी लगेच बोंबाबोब केली. ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती. परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी काहीच प्रयत्न होत नव्हते. कारण हर्णै गावामध्येच गेले दोन दिवस पाणी आलेले नसल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये मुबलकच पाणी होते. तातडीने दापोली नगरपंचयतीचा पाण्याचा बंब बोलावण्यात आला. बंब येण्यास उशीरच झाला होता. आल्यावर बंबाच्या साहाय्याने चालू असलेली पूर्ण आग विझविली. तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. तसेच सुदैवाने या गाडीच्या डिझेल टँक मध्ये डिझेलच नव्हते नाहीतर अग्नीतांडव निर्माण झाले असते. आजूबाजूच्या ग्रामस्थांना तीच भीती होती. तब्बल दीडच्या सुमारास हा सुरू झालेला “ट्रकचा बर्निंग थरार” ४ वाजण्याच्या सुमारास संपला.
घटनास्थळी सदरची आग विझवण्यासाठी नगरपंचायतीची अग्निशमन दलाची टीम, ग्रां पं सदस्य इस्माईल मेमन, राकेश तवसाळकर, अभिजित पतंगे, साईराज मोरे, अमोल चौलकर आदी गावातील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. उपसरपंच – महेश पवार, सरपंच – ऐश्वर्या धाडवे, सर्व सदस्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. सदर घटनेचा अधिक तपास हर्णै पोलीस करत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here