गुहागर – दाभोळ सागरी पोलीस ठाणे व गुहागर पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आज दाभोळ खाडी मध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पाण्यात बुडणा-या लोकांना वाचविण्याची माॅक ड्रिल घेण्यात आली.
यावेळी समुद्रात अचानक वादळ त्यामुळे मच्छीमारांचे होणारी तारांबळ त्याचप्रमाणे समुद्रातून बोटीतून जाताना एखादी दुर्घटना घडली तर त्यावर कोणती उपाययोजना करावी आपला जीव कसा वाचावा प्रात्यक्षिक माॅक ड्रिल द्वारे करून दाखविण्यात आले यावेळी पी.ए.हिरेमठ,सपोनि व पाच पोलीस अंमलदार दाभोळ सागरी पोलीस ठाणे, बी.के.जाधव सपोनि,पोलीस कॉन्स्टेबल कदम, ,रहाटे, घोसाळकर, वैभव चौगले, असे पाच पोलीस अंमलदार गुहागर पोलीस ठाणे तसेच सागर कन्या बोटीवर कार्यरत असणारे आर.डी लाड पोउनि नौका विभाग पावसकर पोउनि नौका विभाग व इतर नौका विभागाचे 2 कर्मचारी असे हजर होते.