बातम्या शेअर करा

गुहागर – गेले सहा महिने एसटी संपात होरपळलेली लालपरी एकदाची रस्त्यावर आली, मात्र आता तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी एसटी आगारात डिझेल भरणारी बस आता खासगी पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी तासनतास रांगेत उभी असलेली दिसून येते. अगोदरच संपात होरपळलेले प्रवासी उन्हाळ्याच्या तीव्र झळा व वेळेचा अपव्यय यामुळे एसटी सेवेला व प्रवाशांना नाना कळा सोसाव्या लागत आहेत.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या आपत्तीत एसटी सेवा खूपच डबघाईल आलेली बघायला मिळाली. त्यानंतर लगेचच कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हा संप गेले सहा महिने सुरू होता, यामध्ये एसटीचे अपरिमित असे नुकसान झाले. एसटी महामंडळाने संपावर तात्पुरता उतारा म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ व इतर सेवा-सुविधांची पुंगी वाजवून वेळ मारून नेली व विलीनीकरणाचा मुद्दा गुंडाळून ठेवला. अखेर संप मिटला व एसटीची लालपरी काही दिवसांपूर्वी सर्वच मार्गावर धावू लागली. त्यामुळे एसटीवर अवलंबून असलेल्या व भाडेवाढीने कंबरडे मोडलेल्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आता एसटी पुढे एक नवे संकट उभे ठाकले दिसून येत आहे. संपापूर्वी एसटी बसमध्ये डिझेल संबंधित आगारांमध्ये भरले जात होते. मात्र काही घरांमधील बसेस खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल भरताना दिसत आहेत. एसटीला डिझेल भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने बसमधील प्रवाशांची ही मोठी कोंडी झालेली आहे. सध्या उन्हाळा तीव्र आहे घामाच्या धारा अंगावरून वाहत असताना एसटी बस भर उन्हात उभे राहून पंपावर डिझेल भरताना दिसून येत आहेत. गेले सहा महिने संपात होरपळलेल्या प्रवाशांना आणि संपातील चालक-वाहकांना एसटी सेवा सुरु सुरळीत झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला असला, तरी या परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here