गुहागर – कोरोना महामारी मध्ये आपला जीव धोक्यात घालून ज्या आशा स्वयंसेविका यांनी आपल्या गावासह आपला परिसर कोरोना मुक्त केला त्या आशा स्वयंसेविकाना व मदतीनस यांना मानधनासाठी झटावे लागत आहे. कारणही तसंच आहे शासनाचा जीआर आहे. लेखी आदेश आहेत. असे असताना मात्र ग्रामसेवकांचा मनमानी कारभाराचा फटका आशा स्वयंसेविका बसतोय त्यामुळे ग्रामसेवक हे पद शासनाच्या परिपत्रक असताना त्याला केराची टोपली दाखवत आहे की असा प्रश्न सर्वसामान्य आशा स्वयंसेविका ना पडला आहे.
कोरोनाच्या महामारी मध्ये आशा स्वयंसेवकांनी व मदतीनीस यांनी केलेल्या कामाचा मानधन द्यावे म्हणून शासनाने एक परिपत्रक काढले या परिपत्रकामध्ये आशा स्वयंसेविका व मदतनीस ज्या ठिकाणी काम करतात त्या ग्रामपंचायतीच्या ग्राम वित्त आयोगातून प्रत्येक महिना एक हजार रुपये मानधन देण्याचे लेखी आदेश काढण्यात आले मात्र असं असतानाही गुहागर तालुक्यातील जवळपास 90 टक्के ग्रामपंचायती मधुन अद्यापही आशा स्वयंसेविकाना व मदतनीस यांना मानधन देण्यात आलेले नाही यावेळी तालुक्यातील ग्रामसेवकाकडून आशा स्वयंसेविका ना उद्धट उत्तरे दिली जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र आणा, गटविकास अधिकाऱ्यांना यांना आम्हाला फोन करायला सांगा अशी तंबी दिली जात आहे. त्यामुळे ग्रामसेवक पद मोठे की गटविकास अधिकारी पद मोठे असा प्रश्न आता आशा स्वयंसेविका ना पडला आहे. येणाऱ्या काही दिवसात ग्रामसेवकांनी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जर मानधन दिले नाही तर काम बंद करण्याचा इशारा आशा स्वयंसेविकानी दिला त्यामुळे जर गावातील नागरिकांना कोणत्या सोयी सुविधा मिळाल्या नाहीत आणि काही अडचनी निर्माण झाल्या तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे ग्रामसेवक असतील असे आशा स्वयंसेविका यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
काही ठिकाणी ग्रामसेवक हे आपल्या गावचा निधी कमी आहे. तुम्हाला एवढे पैसे देता येणार नाहीत त्यामुळे तुम्ही फक्त दोनच हजार घ्या आणि कुणालाही न सांगता गप्प राहा अन्यथा आम्ही तुमची नोकरी घालू अशा धमक्या ग्रामसेवक देत आहेत.
याबाबत गुहागरचे गटविकास अधिकारी यांना संपर्क साधला असता आपण सर्व ग्रामपंचायतींना लेखी आदेश काढल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसेवक लेखी आदेशाचे पालन करत नसतील तर त्या बाबत तक्रार करा आम्ही त्याची दखल घेऊ असेही त्यांनी प्रगती टाइम्सशी बोलताना सांगितलं