गुहागर ; RGPPL मधली वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प ..

0
239
बातम्या शेअर करा

गुहागर- देशातला गॅसवर चालणारा सर्वात मोठा प्रोजेक्ट असलेल्या अंजनवेल येथील RGPPL मधली वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे कामगार वर्गात मोठी खळबळ उडालीय…..निर्माण केलेली वीज खरेदी करण्यासाठी ग्राहक नसल्यामुळे RGPPL चं भविष्य अंधारमय झालंय तर हजारो कामगारांचा रोजगार देखील धोक्यात आलाय. 1 एप्रिल पासून कंपनीमध्ये वीजनिर्मिती बंद असून 1950 मेगावॅट क्षमता असलेल्या प्रोजेक्ट मधील तीनही प्लॅन्ट सध्या पूर्णपणे बंद आहेत.

आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅस चे वाढलेले दर वीजनिर्मितीला परवडणारे नसल्यामुळे कंपनीकडून विजेचा दर हा इतरांच्या तुलनेने जास्त होता परिणामी RGPPL ला ग्राहकच मिळेना झाल्यामुळे कंपनी धोक्यात आलीय. गेल्या वर्षभरात कंपनीकडून सरासरी वीज केवळ 200 ते 250 मेगावॅट एवढीच होत होती…..कंपनी वाचवण्यासाठी प्रशासनांकडून केंद्र आणि राज्य सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार देखील केल्याची माहिती कंपनीचे सी इ ओ असीमकुमार सामंत यांनी दिली होती.मात्र सरकार कडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे आज अखेर कंपनी विजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here