मुंबई – राज्यात आज गुढीपाडवा आणि नववर्ष उत्साहात साजरे केले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध कमी झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरें सार्वजनिक सभेत बोलत हाेते राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली
.”जेव्हा माणूस स्वाभिमान गहाण टाकतो, तेव्हा उरतात ती फक्त प्रेतं, असं म्हणत राज ठाकरेंनी जनतेला स्वाभिमान जागा ठेवत यांना यांची जागा दाखवा,” असं राज ठाकरे म्हणाले.
अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा”; राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका २०१९मध्ये विधानसभेचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला
“माझ्या कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा असं मुख्यमंत्री म्हणालेत, मग पहिल्यांदा त्यांना सांगा की मुंबई महानगर पालिकेत ये जा करू नका. मला ईडीची नोटीस आली मी गेलो ना चौकशीला, अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा. हे सगळं २०१९ चं आहे,
या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका,” असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं.प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे म्हणाले.
आमदारांना कसली घरं वाटताय? राज ठाकरेंची टीका
“आमदारांना मुंबईत घरं द्या आणि त्यांची फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले. आमच्या आमदाराने सर्वात आधी त्यांना विरोध केला. आमदारांना मिळणाऱ्या पेंशनलाही त्यांनी विरोध केला. ते लोकांसाठी काम करत आहेत, उपकार करत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितलं होतं” असं राज ठाकरे म्हणाले.
काम नाही केलं, त्याला सत्तेवर बसवलं; राज ठाकरेंचा जनतेला सवाल
“ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला सारून काम न करणाऱ्यांना तुम्ही सत्तेवर बसवलं, मग काम करून काय फायदा, लफंगेगिरी करणाऱ्यांना तुम्ही सत्तेत बसवत आहात,” असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला केला.राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं, राज ठाकरेंचा आरोप
१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असं राज ठाकरे म्हणाले.जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचाही आरोप राज ठाकरे यांनी केला
आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.महाराष्टात सगळीकडे बोंबाबोंब- राज ठाकरे
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूआहेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय, महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य मिळायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.