चिपळूण ; १४ रोजी ग्रामीण कबड्डी स्पर्धा ; विनोद तावडे, निलेश राणे यांची उपस्थिती

0
136
बातम्या शेअर करा

चिपळूण – भाजपा चिपळूण माजी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या मातोश्री श्रीमती शेवंती काशिराम भोबस्कर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भोबस्कर परिवार व भाजपा कौंढरताम्हानेतर्फे १४ व १५ मार्च रोजी ग्रामीण कबड्डी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चिपळूण नगरपरिषदेसमोरील खेडेकर क्रिडा संकुलात होणार आहे, अशी माहिती भाजपा चिपळूण तालुका माजी तालुकाध्यक्ष व श्रीमती शेवंती यांचे चिरंजीव विनोद भोबस्कर यांनी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन दि. १४ रोजी कौंढरताम्हाने सरपंच सौ. मुग्धा गुरव व माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या हस्ते होईल. दि. १५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ७ कबड्डीचा अंतिम सामना, रात्रौ ७ ते ८ बक्षिस वितरण समारंभ व श्रीमती शेवंती भोबस्कर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा केला जाणार आहे. रात्रौ ८ ते ९.३० ह.भ.प.साई महाराज कुढळे (पुणे) यांचे सुश्राव्य किर्तन होईल. यावेळी भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेला व अमृतमहोत्सवी वाढदिवस प्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच क्रिडा रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भोबस्कर परिवार व भाजपा कौंढरताम्हानेतर्फे करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here