गुहागर – गुहागर तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठेत असलेल्या शृंगारतळी येथे दोन वडाप वाल्यांमध्ये हमरीतुमरी होऊन अश्लील शिव्यांचे जणूकाही प्रदर्शनच थाटले होते. अनेकांनी यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही एका गाडीतील प्रवासी उतरवून दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले. येथील सुरक्षा मात्र ऐरणीवर असल्याचे येथील प्रवाशांमधून बोलले जात होते.
कोरोना काळात गुहागर चिपळूण वडाप संघटनेतर्फे प्रवाशांना योग्य दरात सेवाव्रताचे योगदान देणाऱ्या दोन वडाप वाल्यांनी शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान आपल्या नंबर वरून शृंगारतळी बाजारपेठेत हमरीतुमरी केली. यावेळी या दोघांनी एकमेकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावरही धावून गेले. काहींनी त्यांना समजावण्याचे प्रयत्नही केले, मात्र ते निष्फळ ठरले.
इतरवेळी शांत व सुरळीतपणे जाणाऱ्या वडापमध्ये हमरीतुमरी पाहून अनेकजण अवाक झाले. चक्क दुसऱ्या गाडीतील प्रवासी उतरवून आपल्या गाडीत प्रवासी बसवून हे महोदय चिपळूणकडे रवाना झाले. वडापमध्ये बसलेल्या प्रवाशांसमोर आपण केलेले वर्तन व अश्लील भाषेत शिवीगाळ कितपत योग्य आहे ? गुहागर – चिपळूण वडाप संघटना यांच्या हमरीतुमरीचा कसा शेवट करते किवा यांना शिस्त लावते, याबाबत प्रवाशांमधून चर्चा होत होती.