चिपळूण – चिपळूण तालुक्यातील दाभोळ खाड्यांमध्ये वाळूचा अनधिकृत उपसा सुरू असुन . दिवसाला पाचशेहून अधिक ब्रास वाळू उपसली जात आहे. अनधिकृत उपसा करणाऱ्या बोटी कोणाच्या आहेत, ?त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी चिपळुणातून होत आहे. तर चार बोटींनी वाळू उपसा करण्याची परवानगी असताना तब्बल शंभरहून अधिक बोटींनी वाळू उपसा सुरू आहे. याकडे मात्र महसूल विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
खाडी किनाऱ्यावर असणाऱ्या कालुस्ते भागातील सरकारी आणि खासगी जागांवर वाळूचे डोंगर उभे केले जात आहेत. रात्री वाळू उपसा करणाऱ्या बोटींच्या आवाजामुळे खाडी परिसरातील लोकांचं जगणं मुश्कील झालंय
वाशिष्ठी खाडीत वाळू उपसा करण्यासाठी दोन गटांत खनिकर्म विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी अनेक व्यावसायिकांनी संपूर्ण खाडीत धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे चार बोटींनी वाळू उपसा करण्याची परवानगी असताना तब्बल शंभरहून अधिक बोटींनी वाळू उपसा सुरू आहे.
चिपळुणातील वाळू व्यावसायिकांनी हातपाटीने वाळ उपसा करण्यासाठी आरक्षित असलेल्या गटांपैकी दोन उपसा करण्यासाठी परवाना घेतला आहे. खनिकर्म विभागाकडून एका गटात दोन आणि दुसऱ्या गटात तीनशे असे एकूण पाचशे ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक रॉयल्टी भरून घेण्यात आली आहे. परवाना नसलेल्या गटातही काही व्यावसायिकांनी वाळू उपसा सुरू केला आहे. दिवसरात्र शंभरहून अधिक बोटींनी वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर भागात जरा वाळू वाहतूक झाली की कारवाई करणाऱ्या महसूल विभाग हा या कारवाई कडे का कानाडोळा करत आहे. या चर्चेला सध्या वेग आला आहे. तरी संबंधित अधिकारी वर्गाने याकडे त्वरित लक्ष देऊन तालुक्यातील संपूर्ण बेकायदेशीर वाळू बंद करावी अशी मागणी जोर धरत आहे