मुंबई – अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत.
सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले आहेत. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे