चिपळूण – बचत गटाच्या महिलांकडून विस्तार अधिकार्याने 20 ते 25 हजारांच्या पावत्या घेतल्या. मात्र, त्यांना 10 ते 15 हजारच त्यांच्या हातावर टेकवले. काही गटांना तर त्यांना पैसेच मिळालेले नाहीत. प्रशिक्षण देणार्या अधिकार्यांचेही अनुदान त्या अधिकार्याने लाटले आहे. काही ग्रामपंचायतींनी तर ग्रामनिधीतून बचत गटांचे पैसे दिले आहेत. संबंधित विस्तार अधिकार्यांनी 6 लाखाहून अधिक पैसे लाटून महिला बचत गटांची फसवणूक केली. यावरून चिपळूण पंचायत समितीच्या सभेत आरोप-प्रत्यारोप झाले.
चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सभापती रिया कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बीडीओ प्रशांत राऊत, उपसभापती प्रताप शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या आरोपावर बीडीओ प्रशांत राऊत म्हणाले, या चौकशीची जबाबदारी सहायक गटविकास अधिकार्यांवर सोपवली होती. मात्र, सध्या त्यांची प्रकृती बिघडल्याने ते अनुपस्थित आहेत. प्रशिक्षण झालेल्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीकडून खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र तो मिळालेला नाही. यापुढे मी स्वतः 15 दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल देतो.