गुहागर महसूलची धडक कारवाई ; 45 ब्रास वाळू जप्त

0
437
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील परचुरी येथे अवैद्य वाळू साठा प्रकरणी महसूल विभागाने धडक कारवाई केली असून 45 ब्रास वाळू गुहागर महसूल विभागाने जप्त केली आहे.

परचूरी येथे अवैद्य वाळू व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार गुहागर तहसीलदार यांच्याकडे आली होती त्याची दखल घेत तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी गेले चार दिवस सर्कल अधिकारी व तलाठी यांची टिम परचूरी येथे पाठवून अवैध वाळू साठे शोधून काढले आणि ते जप्त करण्यात त्यांना यश आले.

परचूरी गावात तीन ठिकाणी वाळू साठा करून ठेवण्यात आला होता. शुक्रवारी तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी परचूरी येथे भेट दिली असता तीन ठिकाणी वाळू साठा झाडांच्या फांद्यांमध्ये दडवून ठेवलेला होता. महसूल विभागाने हा अवैद्य वाळू साठा जप्त केला असून ज्या जागेत सापडला त्या जागा मालकाला महसूल विभागाने नोटीस काढून सुनावणी ठेवण्यात आली आहे. या महसूल विभागाच्या कारवाईमुळे अवैद्य वाळू व्यवसाय करणाऱ्यांची धावपळ उडाली आहे. गुहागर महसूल विभागाच्या धडक कारवाईने गुहागर तालुक्यातील इतर अवैध धंदे आता बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील हेदवी, वेळणेश्वर , पालशेत ,नरवण याठिकाणी सुरू असणारा वाळू व्यवसाय सुद्धा आता बंद करण्यासाठी महसूल विभाग कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here