चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाडीचे प्रमाण वाढत असल्याने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते.
मात्र असे असताना सुद्धा आज चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने ते मात्र मोठ्या प्रमाणात आठवडा बाजार भरल्याचे निदर्शनास आले. यावेळी या बाजारात अनेक ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करून होते. अनेकांच्या तोंडाला मास्क लावले नसल्याचे सुद्धा दिसत होते. एकंदरीत जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला या आठवडा बाजाराने केराची टोपली दाखवली असल्याची याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती. मात्र असं असलं तरी दिवसभर आठवडा बाजार सुरू असताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने यावर कारवाई का नाही? केली त्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.