चिंताजनक ; रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

0
357
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या
दिवसागणिक वाढत असताना मंगळवारी बाधित रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. 24 तासात 1 हजार 713 अहवालांमध्ये तब्बल 203 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 722 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत.

जिल्ह्यात 24 तासात 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 942 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.09 टक्के आहे. नव्याने 203 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 70 हजार 76 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 484 तर संस्थात्मक विलीगिकरणात 138 रुग्ण उपचार घेत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here