दापोली – सहा महिन्यात गुंतवणूकदारांना दामदुप्पट आणि एजंट ना दरमहा 20 टक्के कमिशन असे आमिष दाखवून सांगली येथील एका ग्लोबल मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी ने दापोली कराना तब्बल 80 कोटी रुपयेचा चुना लावला आहे. या कंपनीचा मालक परदेशात फरार झाल्यानंतर त्याने एका ऑडिओ क्लिपद्वारे आपण आता 0 झालो असून यापुढे कंपनीच्या नावावर कोणीही पैसे गोळा करू नयेत असे स्वतः नमस्कार केले आहे.
सांगली शहरातील ग्लोबल काम करणाऱ्या एका मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीचा सहा महिन्यापूर्वी उदय झाला होता फॉरेक्स मार्केट आम्ही ट्रेडिंग करतो असे सांगत या कंपनीच्या एजंटांनी दापोली तालुक्याच्या कानाकोपऱ्या आपले जाळे विस्तारले याच एजंटांनी दापोली- मंडणगड तालुक्यातील एका परिसरातील एका पोस्ट खात्यात काम करणाऱ्या एजंटला हाताशी धरून दापोली गुंतवणूकदारांकडून गेल्या सहा महिन्यापासून पैसे गोळा करायला सुरुवात केली. सुरुवातीला 500 डॉलर म्हणजेच 38500 रुपयांची गुंतवणूक केल्यावर दरमहा सहा ते नऊ टक्के इतका परतावा देण्यात येणार असल्याचे सांगत 77000 पासून 71 लाख रुपया पर्यंतचे आकर्षक पॅकेज तयार केले होते. 77 लाखाची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला दरमहा 18 ते 20 टक्के इतका भरगोस परतावा देण्याचेही कंपनीने सांगितले होते. कंपनीच्या सुरुवातीला पहिले चार महिने गुंतवणूकदारांना दरमहा मोठ्या प्रमाणावर परतावाही दिला गेला त्यामुळे अनेक गुंतवणूकदारानी कंपनीवर विश्वास ठेवत अधिका अधिक रक्कम गुंतवत गेले. दापोली व मंडणगड तालुक्यातील अनेक गुंतवणूकदाराने सांगलीच्या वाऱ्या करत एजंटने बिनदिक्कत काम करू लागले दरमहा बँक खात्यामध्ये भरघोस रक्कम देत राहिल्याने अनेकांनी आपली बँक खात्याची पासबुक सोबतच घेऊन नवीन गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढायला सुरुवात केली.आणि एजंटला भरघोस कमाई होऊन गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये पैसे गुंतवायला लावल्यावर ग्लोबल कंपनीच्या एजंटना ही भरगोस कमिशन वाटण्यात आले. पाच टक्के पासून ते तब्बल वीसक्यांपर्यंत कमिशन एजंटना मिळायला लागल्यावर त्यानेही लोकांकडून मोठ्या रक्कमा स्वतःच्या जबाबदारीवर उचलायला सुरुवात केली. महिन्यातून तीन वेळा आकर्षक कमिशन मिळत असल्याने अनेक ज्यांनी अलिशान गाड्या गाड्या खरेदी केल्या असल्याची खात्रीशीर माहिती नुसार लाटवण परिसरातील मार्केटिंग क्षेत्रात प्रवीण असलेल्या एका एजंटने असते असते कदम टाकत दरमहा तब्बल 22 लाख रुपये कमिशन कोटी कमवत होता असे तोच एजंट दापोली कराना सांगत फिरत असे. त्यामुळे या कंपनीच्या जाळ्यात नवनवीन एजंट ओढले जात होते.
मर्सिडीज कार, रेंज रोवर गाडी पासून मर्सिडीज बॅच फॉर्च्यूनर क्रेटा बुलेट क्लासिक अशा आलिशान गाड्या बिजनेस स्वरूपात कंपनीच्या वतीने लावण्यात आल्या होत्या. तर 11 लाख रुपयांची गुंतवणूक आणल्यावर दुबईची ट्रिप देण्यात आली होती. दापोलीतील काही मयूरपंखी एजंट दुबईला जाऊन आले मज्जा करून आले आहेत. यात एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचाही एक कदम पुढे होता त्याने पाच कोटी रुपयांचा व्यवसाय करत मर्सिडीज कार ही बक्षीस स्वरूपात लावले होते असे खात्रीलायक वृत्त आहे. तर क्रेटा आणि फॉर्च्युनर गाडी जिंकणारे दापोलीत अनेक एजंट होते. गाडी जिंकल्यानंतर एजंट यांच्या बैठका पार्ट्या दापोली येथील आलिशान हॉटेलमध्ये संपन्न झाल्या होत्या तर गोवा सारख्या ठिकाणी या कंपनीच्या फाइव स्टार हॉटेल मध्ये रंगीन पार्ट्या घडत असल्याचेही आता सामोरे येत आहे. सरकारी कर्मचारी एजंट भरघोस फायदा देणाऱ्या या कंपनीचा मुख्य एजंट हा सरकारी कर्मचारी असल्याने त्याने अनेक योजना हाताशी धरून शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जाळ्यात ओढून एजंट बनविले होते. काही शिक्षकांनी आपल्या पत्नीच्या नावाने कमिशन मिळन्यासाठी एजंट गिरी केली होती. तर अनेक शिक्षकाने शिक्षक पतपेढी तून कर्ज काढून सदर कंपनीत पैसे गुंतविले होते. शाळा सुरू असतानाही काही शिक्षक सदर कंपनीसाठी काम करत असल्याचेही उघड झाले असून या शिक्षकांवर विभागामार्फत चौकशी कारवाई होणार असल्याचेही वृत्त आहे. शिक्षकांबरोबरच दापोलीतील काही ग्रामसेवक व तलाठी ही या कंपनीच्या जाळ्यात एजंटांच्या बोलण्यावर बोलून ओढले गेले आहे त सर्वच बाबतीत विजय आपलाच होईल अशीही चर्चा आता दापोलीत सुरू झाली आहे.
तब्बल 80 कोटीला चुना लावून दापोली ,मंडणगड ,खेड ,चिपळूण, कोल्हापूर या परिसरातून दापोली मध्ये एजंट मार्फत तब्बल 80 कोटी रुपयांची गुंतवणूक ग्लोबल कंपनी मध्ये झाली आहे. अल्पावधीत दामदुप्पट रक्कम आकर्षक व भरगोस कमिशन यामुळे अनेक एजंटांनी आपली तुंबडी भरत नेहमीप्रमाणे यावेळी ही गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडले आहे. लोकांच्या पैशावर कमिशन मिळवत स्वतःसाठी अलिशान गाड्या हे सदर एजंट वापरत असून गेले आठ दिवस यातील काही एजंट भूमिगत झाले आहेत. आठ दिवसापूर्वी कंपनीचे सांगली येथील मुख्य कार्यालय पूर्णपणे बंद असून कंपनीचा मालक नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतातून परदेशी गेल्याचे मालकाने एका मीटिंगमध्ये जाहीर केले आहे. आपल्याकडे आता काहीच पैसे शिल्लक नसून महाराष्ट्र बंद देशातील कंपनीच्या एजंटांनी लोकां कडून पैसे गोळा करू नयेत असे सांगितले आहे. तर मला परदेशी जाण्यासाठी 50 लाख रुपयांचा खर्च हा आला असल्याचे सदर कंपनीचा मालकाने जाहीर केले आहे. गुंतवणूकदार हवालदील मोठ्या अमिशा पोटी गुंतवलेले पैसे उडाल्याचे समजताच गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. काहीनी तर आपल्या घरावर कर्ज काढत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. तर अनेकांनी आपले दागिने गहाण ठेवून गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या मालक फरार असल्याने आता या गुंतवणूकदारांचे पैसे मिळणे कठीण झाले असून काही दिवसातच दापोली पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे….