चिपळूण – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वपूर्ण असा कुंभार्ली घाट या घाटातील डांबरीकरणं करण्यासाठी घाटातील अवघड वाहतूक दिनांक 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या दोन दिवशी बंद करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले त्यामुळे या घाटातील अवघड वाहतूक या दोन दिवशी बंद असल्याने अवजड वाहतूक करणारे वाहन आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा कुंभार्ली घाट गेली अनेक वर्ष या घाटातील रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या घाटातील रस्त्यावर अनेकवेळा अवजड वाहने बंद पडून फसले आहेत. त्यामुळे या घाटातील वाहतूक दहा- दहा ते बारा- बारा तास बंद राहिली आहे. याच गोष्टीचा विचार करून अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वर्षाच्या अखेरीस असलेले दोन दिवस या घाटातील अवजड वाहतूक बंद करून हा रस्ता चांगला करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या दोन दिवशी चिपळूण तालुक्यातील पोपळी नाका पाटण तालुक्यातील हेळवाक या दोन परिसरात पासून ही वाहतूक बंद राहणार आहे.